Monday, August 20, 2012

सहज सख्या एकटाच येई सांजवेळी....


निवळशंख लाटांच्या खळखळाटात वाहून गेलेला किनारा शोधत उगाचच फेसाळलेल्या दर्याकडे निरखून पाहत राहिलो मी. आणी तू मात्र कधीच निघून गेली होतीस दुसर्याच कुठल्यातरी लाटेवर स्वार होऊन असे कित्येक प्रदेश पादाक्रांत करत...
शुभ्रस्फटिक अभ्रातून तू एकदाच गीरीशिखारावर रेंगाळलीस  तीही क्षणभर, पण त्या डोंगरावर उगवलेल्या प्रत्येक गवताच्या लवेत तुझ्या स्पर्शाचा भास आहेच...
अलगद काहीतरी गुणगुणत कोकिळेशी हितगुज केलस तू कधीतरी, पण आता पावसाच्या धारांनाच तुझ्या आवाजाची  ओढ लागल्ये चातकासारखी ...
मग जर आज अश्या ह्या सांजवेळी, चुकून शीळ निघाली ओठावरून आणी ती तुझ्या ओठांनाच सांगावीशी वाटली थेट, तर त्यात काय चुकलं माझं.
मग येशील न तू,
दूरवर कुठेतरी radio वर बोल ऐकू येताहेत
सहज सख्या एकटाच येई सांजवेळी....

No comments:

Post a Comment

Lemme know what you think.....