निमित्त होतं आदित्यच्या (माझ्या ४ वर्षांच्या पुतण्याच्या ) वाढदिवसाबद्दल त्याला खेळणं घेण्याचं ....परवा मी असाच काहीतरी Ben Ten चं खेळणं आणलं होतं आणि मला काही कळायच्या आत त्यानी ते उघडून assemble करून खेळायला सुरुवात केली सुद्धा .....मला 2 गोड पापे मिळाले , एक मी खेळणं दिल्या दिल्या आणि दुसरा त्याची assembly करून ते खेळायला घेतल्यावर ....
दुपारची जेवणं झाल्यावर आई आणि बाबा वज्रासनात बसले होते आणि आम्ही उद्या त्याच्या Birthday च्या तयारी बद्दल बोलत होतो . अचानक खेळण्याचा विषय निघाला आणि आम्हाला आमचे लहानपणीचे दिवस आठवले ....

"आणि हे सगळं साहित्य जमा करण्याचं काम आमच्याकडे असायचं म्हणजे माझ्याकडे आणि किशोर कडे(माझा मामा - आईचा सगळ्यात धाकटा भाऊ ) , मग त्याची assembly काही आम्हाला जमायची नाही , म्हणून ती अण्णा , जयंता वगरे करून दयायचे . त्यात सुद्धा काठी जर आंब्याची मिळाली किंवा जास्त सुकलेली मिळाली तर काटा जाताना तो तुटायचा म्हणून सगळ्या वस्तू दोन दोन आणायला आम्हाला आधीच सांगून ठेवलेलं असायचं " पटकन मला १२ -१५ वर्षांपूर्वी शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच साधारण जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात २ पेन्सिल चे बॉक्स , २ खोडरबरांचे बॉक्स आणि १ शार्पनर चं बॉक्स घेणारी आई आठवली .........backup plans.......
आमची बालपणं पण अशीच गेली - भोवरा , गोटया , लगोरी आणि डब्बा ऐसपैस खेळण्यात .......अजूनही बऱ्याच वेळा मी जत्रेतून पिपाण्या आणि भोंगे , भिरभिरं किंवा तो जोकेरसारखा माणूस ज्याचे हात आणि पाय joints मधून वर खाली व्हायचे , किंवा ते गोल गोल फिरवण्याच अत्यंत irritating तर्रर्र्र टक तर्रर्र टक टक टक .....आवाज असणारं खेळणं वगरे सर्रास घरी घेऊन येतो ......ते घेताना , ते घेऊन येताना ट्रेन मध्ये , रिक्षात आणि अगदी बिल्डिंग मध्ये आणि लिफ्ट मध्ये मी असा दाखवतो कि जणू ते माझ्या घरी असणाऱ्या एखाद्या लहान बाळासाठीच आणलं आहे .....पण घरी येऊन त्या खेळण्याशी मनसोक्त खेळण्याची मजा काही औरच आहे ......
करून बघा कधी तुम्हीही ......तर्र्र्रर्र टक टक टक टक
No comments:
Post a Comment
Lemme know what you think.....