Tuesday, October 30, 2012

तर्र्र्रर्र टक टक टक टक


निमित्त  होतं  आदित्यच्या  (माझ्या  ४  वर्षांच्या  पुतण्याच्या ) वाढदिवसाबद्दल  त्याला  खेळणं  घेण्याचं ....परवा  मी  असाच  काहीतरी  Ben Ten चं  खेळणं  आणलं  होतं  आणि  मला  काही  कळायच्या  आत  त्यानी  ते  उघडून  assemble करून  खेळायला  सुरुवात  केली  सुद्धा .....मला  2 गोड  पापे  मिळाले , एक  मी  खेळणं  दिल्या  दिल्या  आणि  दुसरा  त्याची  assembly   करून  ते  खेळायला  घेतल्यावर ....

दुपारची  जेवणं  झाल्यावर  आई  आणि  बाबा  वज्रासनात  बसले  होते  आणि  आम्ही  उद्या  त्याच्या  Birthday च्या  तयारी  बद्दल  बोलत  होतो . अचानक  खेळण्याचा  विषय  निघाला  आणि  आम्हाला  आमचे  लहानपणीचे  दिवस  आठवले ....

"काय  खेळणी  असायची  तेव्हाची ....ते  तारेवरच  माकड - एक  cycle  चं  स्पोक , स्प्रिंग  आणि  एक  प्लास्टिक  चं  माकड,  एवढेच  raw material आणि  ते  माकड  टक  टक  आवाज  करत  त्या  तारेवरून  खाली  उतरायचं  हा  खेळ .....साधा  simple  तरी  खूप  मजा  देणारा "....आई  सांगत  होती ....."आणि  ते  चक्र , ते  नुसतं  हातात  घेऊन  इकडून  तिकडे  धावत  सुटायचो  आम्ही , त्याच्यानी  खेळण्यापेक्षा  तेच  आम्हाला  खेळवायचं " मी  म्हटलं ......"आम्ही  त्याला  भिरभिरं म्हणत  असू , आणि  आम्ही  ते  बनवायचो. एक  कागद , एक  काटा - बाभळीचा , बोरीचा  किंवा  मग  जो  मिळेल  तो - नगर  जिल्ह्यात  काट्यांची  कधी  कमतरता  भासली  नाही  आम्हाला , एक  काठी  - कधी  बांबूची , कधी  शिस्वाची  नाहीतर  आंब्याची  नक्कीच  मिळत  असे ....सरळ  काठी  शोधण्यात  जास्त  वेळ  जायचा , पण  बऱ्याच  वेळा  आम्ही  तिरक्या  काठ्या  चालवायचो , आणि  एक  लेंडी  - ती  शोधण्यासाठी  आम्ही  बोरीच्या  झाडाखाली  जायचो , तिकडे  शेळ्या  असायच्या  आणि  लेंड्याहि  ...खूप  सुकलेली  लेंडी  आणली  तर  ती  काट्यात  खोचल्यावर   फुटायची  आणि  खूप  ओली  असेल  तर  हाताला  चिकटायची  म्हणून  साधारण  मध्यम  सुकलेली  अशी  लेंडी  शोधायची , ती  शोधण्याचं प्रमाण  म्हणजे  बोरीच्या  झाडाखाली  जाऊन  मध्यम   दिसेल  अशी  लेंडी  उचलून  थोडी  दाबून  बघायची, ह्याच दरम्यान जर एखाद दोन बोरं मिळाली तर ती पण त्याच हातांनी बिनधास्त तोंडात टाकायचो " माझी  इथे  हसून  हसून  पुरेवाट  झालेली ....मी  नगर  च्या  राहुरी  गावात  तापलेल्या  एका  दुपारी  बोरीच्या  झाडाखाली  परकर  पोलकं  नेसून  शेळीच्या  लेंड्या  वेचणारी  माझी  आई  आणि  काल  आदित्य  साठी  bisleri  च्या  पाण्यात  ताक  घुसळणारी  माझी  आई  compare  करत  होतो .....आणि  मग  तीच  आई  मला  उकिरड्यावर  खेळताना  बघून  २२ -२३  वर्षापूर्वी  ओरडलेली  सुद्धा .....

"आणि  हे  सगळं  साहित्य  जमा  करण्याचं  काम  आमच्याकडे  असायचं म्हणजे माझ्याकडे आणि किशोर कडे(माझा मामा - आईचा सगळ्यात धाकटा भाऊ )  , मग त्याची  assembly काही  आम्हाला  जमायची  नाही , म्हणून  ती  अण्णा , जयंता वगरे  करून  दयायचे . त्यात  सुद्धा  काठी  जर  आंब्याची  मिळाली  किंवा  जास्त  सुकलेली  मिळाली  तर  काटा  जाताना  तो  तुटायचा  म्हणून  सगळ्या  वस्तू  दोन  दोन  आणायला  आम्हाला  आधीच  सांगून  ठेवलेलं  असायचं " पटकन  मला  १२ -१५  वर्षांपूर्वी शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच साधारण  जून   महिन्याचा  पहिल्या  आठवड्यात  २  पेन्सिल चे  बॉक्स , २  खोडरबरांचे  बॉक्स  आणि  १  शार्पनर चं  बॉक्स  घेणारी  आई आठवली .........backup plans.......

आमची  बालपणं पण अशीच  गेली - भोवरा , गोटया , लगोरी  आणि  डब्बा  ऐसपैस  खेळण्यात .......अजूनही बऱ्याच  वेळा  मी  जत्रेतून  पिपाण्या  आणि  भोंगे , भिरभिरं किंवा  तो  जोकेरसारखा माणूस  ज्याचे  हात  आणि  पाय  joints मधून  वर  खाली  व्हायचे  , किंवा  ते  गोल  गोल  फिरवण्याच अत्यंत  irritating तर्रर्र्र  टक   तर्रर्र  टक  टक  टक .....आवाज  असणारं  खेळणं  वगरे  सर्रास  घरी  घेऊन  येतो ......ते  घेताना , ते  घेऊन  येताना  ट्रेन  मध्ये , रिक्षात  आणि  अगदी  बिल्डिंग  मध्ये  आणि  लिफ्ट  मध्ये  मी  असा  दाखवतो  कि  जणू  ते  माझ्या  घरी  असणाऱ्या  एखाद्या  लहान  बाळासाठीच  आणलं  आहे .....पण  घरी  येऊन  त्या  खेळण्याशी  मनसोक्त  खेळण्याची मजा  काही  औरच  आहे ......

करून  बघा  कधी  तुम्हीही ......तर्र्र्रर्र  टक  टक  टक  टक

Sunday, October 21, 2012

Stringlets

Bracelets made up of tennis strings.......life is swirling around in an atmosphere I am very new to, obtuse......words give me a miss at times when I need them the most, words......wordsmith, that's what they used to call me once.....Zapped, what they call me now......

Balance between personal and work life is crucial......if you misjudge the workload as growth (rightly mislead by your manager to believe such crap).....wake up dude/dudette

as yourself is it really worth the juice?

Enjoy life! work is a means to get money, everything else has to be earned to spend the money and live happily.