आठवणी
गावात अजूनही तांबडं फुटत असेल का
कोंबडा आरवत असेल का
कट्ट्यावरच्या गप्पा अजूनही तेवढ्याच रंगत असतील का
पेपरवाल्याच्या स्टालवर अजूनही फुक्टेच जास्त असतील का
शिंदेंच्या सलून मध्ये अजूनही गावाची लफडी चघळली जात असतील का
गावात अजूनही तांबडं फुटत असेल का
कोंबडा आरवत असेल का
मालकीण बाईंकडे TV बघायला सगळी चाळ जमत असेल का
अजूनही गणपती सार्वजनिक असतील का
रंग्याच्या ठेल्यावर अजूनही मिठा मावा रंगत असेल का
शेंबडी नागडी पोरे अजूनही ' नत्लाज पेंचील ' घेत असतील का
लालभडक मोठं कलिंगड बाबा अजून पिंपात टाकत असतील का
नंदू टोमाटोवाला अजूनही साफ्फार्चंद म्हणून ओरडत असेल का
दिवेलागणीला शुभम करोति आणि रविवारी चंद्रकांता लागत असेल का
B. R. Chopra चं महाभारत अजूनही कोणाच्या लक्षात असेल का
चुलीतल्या निखाऱ्यावर पोरे अजूनही कांदे बटाटे भाजत असतील का
फुंकनिचा आवाज अन वसुदेवाचा गजर थंडीतल्या सकाळी जागवत असेल का
त्यावेळी काढलेली ' तरुण मित्र मंडळ ' अजूनही चालू असतील का
सभासदांच्या फिया त्यांच्यापेक्षा जास्त थकत असतील का
शोपेच्या गोळ्यांवर शिट्टी फ्री मिळत असेल का
मुळेमामंच ओये ओये कांदे पोहे ओर
देखा है पेहेली बार रस्त्यावर मारुती कार
अजूनही ओरीजनल गाण्यांपेक्षा हिट जात असेल का
मंगीची वांगी मिळत असतील का अजूनही २ ला ३ किंवा ३ ला २
मधल्या सुट्टीत मुलं अजूनही बोरकूट आणि चिंचोके खात असतील का
गावात अजूनही तांबडं फुटत असेल का
कोंबडा आरवत असेल का
It's really good.
ReplyDeleteNothing else to say.