आणि अचानक ती दरवाज्यात आली, तिचं ते निरागस हसू आज कित्येक वर्षांनी परत अनुभवलं, ते घारे डोळे आणि गोमटा चेहरा....असं वाटलं कि पहाटेच्या वेळी छान अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलाय....माझ्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं...आम्ही चार पाच जण होतो..नेहमीचेच मित्र...आणि त्यात आई नक्की नव्हती...मग आईचा आवाज कुठून येतोय?.....संदीप....संदीप उठ ७ वाजले, ऑफिस ला उशीर होईल बघ....
उठलो, स्वतःशीच हसलो.....कधीकधी आपला मन आपल्याला एकदम ४-६ वर्ष मागे घेऊन जातं....ते दाखवतं जे आपल्याला खूप पूर्वी हवं असतं आणि जगण्याच्या धामधुमीत आपण ते मिळालं नाही म्हणून ते मिळणार नाही असं समजून पुढे गेलेलो असतो पण मन चोर त्याच्या कुठल्याश्या कोपऱ्यात त्या आठवणी जपून ठेवतं आणि एखाद्या निरागस क्षणी आपल्याला flashback मध्ये घेऊन जातं....
खरं तर आता तीही तसं निरागस खळखळून हसत नाही, वयात आल्यमुळे तो अल्लड पणा जावून तिथे एक वेगळाच संकोच आलाय....मुलीचं रुपांतर एका स्त्री मध्ये होतंय....पण ह्या सगळ्यात मी कुठे हरवलोय माहित नाही....मी तिच्या आयुष्यात कधी नव्हतोच ....मला ती आवडायची (कि अजूनही?) ते तिला सोडून सगळ्यांना माहित होतं (कदाचित तिलाही, पण कधी तिनी ते दाखवलं नाही आणि मी विचारलं नाही)...आम्ही नेहमीच मित्रांचे मित्र राहिलो....
पण मग आच अचानक हे पुन्हा काय.....कि मी अजूनही तिच्याच ....साठे सकाळचे ८ वाजलेत, आईनी १ तासापूर्वी उठवलं होतं ऑफिस ची तयारी करायला...आता आपण कॉलेज मध्ये नाही आहात....चला....
नात्यांना नावं न दिलेलीच बरी असतात....नंतर...
No comments:
Post a Comment
Lemme know what you think.....