Sunday, September 16, 2012

ती


विशीच्या  आसपास - चेहऱ्यावर  नुकताच  मिसरूड  फुटलेला , तारुण्याचा  जोश  अन  धमक , निळी  jeans आणि  पातळसा  फिकट  रंगाचा  T Shirt, गळ्यात  मागच्या  वाढदिवसाला  आई  बाबांनी  कौताकाने   घेतलेली  सोन्याची  चेन, पिंगे  डोळे  आणि  Paragon ची  त्यातल्या  त्यात  stylish  अशी  चप्पल.


ती , गोरी , गालावरच्या  केसंजवळ  निळ्या  हिरव्या  शिरा  तिच्या  मऊसुत  त्वचेशी  मस्त  contrast  करायच्या , त्याला  बर्याच  वेळा  तो  तासनतास  नुसता  त्याकडेच  बघत  राहायचा - त्याच्या  स्वप्नात , मग  मधेच  ती  एखाद्या  वाट  चुकलेल्या  batela वळण  लावायची , तिचे  निळेशार  डोळे  त्याच्या  बघण्याकडे  बघायचे  आणि  तो  जागा  व्हायचा ,मग  काहीतरी  कारण  सांगून  वेळ  मारून  न्यायचा . थोडेसे  लालसर  असे  म्हंजे  उन्हाची  तिरीप  पडली  कि  चमकणारे  असे  तिचे  केस  ती  छानशा  क्लीप  मध्ये  अडकवायची  आणि  तेही  लाडिक  पणे तिच्या  चेहऱ्यावरून  दिवसभर  हात  फिरवायचे . तिच्या  हातांचा  अर्धा  वेळ  तिचे  केस  सावरण्यात  आणि  राहिलेला  अर्धा , लिहिण्यात  आणि  हातवारे  करण्यात  जायचा . तिला  काठांची  नक्षी  असलेले  किंवा  बुट्ट्या  बुट्ट्यानचे   पंजाबी  ड्रेस  फार  आवडायचे . रंग  बहुदा  साधेच  असायचे . काहीही  करून  तिच्या  जवळ  राहण्यासाठी  हा  नेहमी  पहिल्या  बेंचवर  बसायचा , अगदी  तिच्या  जवळ . तिला  lavender   perfume   फार  आवडायचा  बहुतेक , ती  आली  कि  बहुदा  पहाटेच्या  वेळी  अंगणात  मस्त  फुलांचा  सडा  पडावा  तसा  सुगंध  यायचा  आणि  हा  त्यातली  फुलं  वेचण्यात  आपलं सर्वस्व  हरवून  जायचा . मग  मागच्या  बेंचवरून   मित्र  लाथा  मारायचे  तेव्हा   शिक्षिका  आल्या  म्हणून  हा  उभा  राहायचा . त्यादिवशी  जोशी  बाईंनी  त्याला  हटकलं  तर  काहीतरी  कारण  सांगून  त्यांनी  वेळ  मारून  नेली . जोशी  बाई  पण  त्यच्यावर  फारश्या  कधी  रागवत  नसत , म्हणजे  तसा  तो  त्यांचा   favourite  student   होता , म्हणून  एखाद  वेळेस  त्याच्या  बारीक  सारीक  गोष्टींकडे  त्या  दुर्लक्ष  करायच्या . त्याचे  मित्र  त्याला  त्यांच्यावरून   चिडवायचे  पण  त्याचं तिकडे  लक्षच  नसायचा . तो  कायम  तिच्यातच  गुरफटलेला , हरवलेला  असायचा . एके  दिवशी  तिचा  रुमाल  पडला  म्हणून  तो  मैलभर  तिच्या  कार  च्या  मागे  पळत  गेला . आणि  तिनी  उतरल्यावर  विचारलं  तर  सहजच  इकडे  आलो  होतो  असा  सांगून  निघून  गेला .
एके  दिवशी  हा  college  च्या  कट्ट्यावर  एकटाच  बसून  होता , दूर  कुठेतरी    पाहत , हरवलेला  . आनंदा  आला  आणि  म्हणाला  अरे  चल  जोशी  बाईंचा  आज  last day  आहे  आपल्या  college मध्ये , त्यांना  farewell द्यायचंय  . आनंद  नि  बराच  प्रयत्न  करूनही  तो  काहीच  बोलला  नाही . मग  अजून  एक  दोन   मित्र  येऊन  गेले  पण  त्यानी   आपला  कट्टा  सोडला  नाही . मागून  farewell च्या  tayarya  गाणी  गप्पा  इत्यादीचे  आवाज   कानावर  येत  होते . मुलं  आपापल्या  नादात  होती . जोशी  बाईही  थोड्या  upset वाटत  होत्या . ह्या  college मध्ये  गेल्या  2 वर्षात  त्यांनी  चांगलीच  शिकवण  घडवली  होती . तशा  त्या  कडक  स्वभावाच्या असल्या  तरी  वेळी  मुलांचे  लाडही  करायच्या . त्यामुळे   त्या    आज  जाणार  म्हणून  बरीच  मुला  upset होती . त्यांच्या  नवरयाची   म्हणे  कुठेतरी  transfer झाली  होती . अध्यक्ष  आणि  इतर  manyvaranch   भाषण  झालं , जोशी  बाईही  मार्गदर्शनपर   बोलल्या . जाता  जाता  त्यांच्या  डोळ्यात  पाणी  आलं , आणि  बऱ्याच  मुलींनाही  हुंदका  आवरता आला नाही  . मुलं  त्यांची  टर  उडवण्यात  वेळ घालवत  होती . जोशी  बाईंचा  favourite   student  कुठे  आहे  ह्याचं  फारसं  कुणाला  भान  नव्हतं  . त्यांच्या  ambassador car मध्ये  बसण्यासाठी  त्या  निघाल्या , वळून  एकदा  बघून  सगळ्या  मुलाना  bye   केला . बसत  असताना  त्यांच्या  seat वर  एक  गुलाबाचं  फुलं  दिसलं . त्यांनी  ते  सहज  उचलून  डोक्यात  माळल , आणि  driver  नि  गाडी  सुरु  केली . वारा   खिडकीतून  आत  शिरला , थोडासा  धुरळा  उडाला  आणि  त्याच्या  शांत  होईपर्यंत   गाव  मागे  पडू  लागला . पुन्हा  एक  नवीन  गाव , नवीन  college , नवीन  विद्यार्थी ….त्यांचं  मन  त्यांचाशी  बोलू  लागलं. त्या  उडालेल्या  धुराळ्यात  गुलाबाखालचा  कागद  कधी  खिडकीतून  उडून  बाहेर  पडला  ते  कुणालाच  कळलं नाही . आनंदाच्या   सायकलीला लागून       त्याच्या  हातात  आला .


सुंदर  रेखीव  अक्षरात   त्यावर  लिहिलेल्या   ओळी  त्याने  अधासःसारख्या  वाचून   काढल्या .
तू , गोर्या  गालांची , मोजक्या  रानफुलांची   , तू  गहिऱ्या  डोळ्यांची , भूरभूर्या  केसांची
तू  निखळ  निर्मल  हास्याची  आणि  तू  तरुण्यानी  भरलेल्या  बांध्याची , तू
तू ,  कधी  होशील  का  माझी ….


ते  अक्षर  त्याच्या  ओळखीचं  होतं . सात  वर्षांपासून  त्याला  ओळखणार्या  मित्राचं , ‘त्याचं'. ते  अक्षर  त्याचं  होतं .


No comments:

Post a Comment

Lemme know what you think.....